Latest

BHIM UPI ट्रांझॅक्‍शनबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा निर्णय, २६०० कोटी रुपये प्रोत्‍साहनपर रक्‍कम मंजूर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : BHIM UPI ट्रांझॅक्‍शनबाबत आज (दि.११)  केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्‍यात आला. डिजिटल व्‍यवहारासाठी २६०० कोटी रुपये प्रोत्‍साहनपर रक्‍कम मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे BHIM UPI च्‍या माध्‍यमातून होणार्‍या आर्थिक व्‍यवहारांना प्रोत्‍साहन मिळेल, असा विश्‍वास केंद्र सरकारने व्‍यक्‍त केला आहे.

आजच्‍या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्‍वाचे निर्णय झाले. यामध्‍ये पंतप्रधान मोफत धान्‍य योजनेच्‍या नावात बदल करण्‍यात आला आहे. आता ही योजना पंतप्रधान गरीब कल्‍याण अन्‍न योजना कार्यक्रम या नावाने ओळखली जाईल. तसेच तीन बहुस्‍तरीय सहकारी संस्‍थाप स्‍थापन करण्‍याचाही निर्णय आजच्‍या बैठकीत घेण्‍यात आला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT