Latest

DS-SAR सह इतर ६ उपग्रहांचे ३० जुलैला प्रक्षेपण, जाणून घ्या ‘इस्रो’च्या नवीन मोहिमेविषयी

दीपक दि. भांदिगरे

श्रीहरिकोटा : पुढारी ऑनलाईन; चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या चांद्रयान-३ मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता त्याच्या पुढील मोठ्या प्रक्षेपणाच्या तयारीत आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून C56 (PSLV-C56) चे ६ उपग्रहांसह (SDSC) ३० जुलै रोजी सकाळी ६.३० वाजता प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती ISRO ने दिली आहे. दरम्यान, त्याआधी इस्रो २६ जुलै रोजी पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV-C56) मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे.

पीएसएलव्ही-सी५६ श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून DS-SAR उपग्रह आणि ६ उपग्रहांना घेऊन उड्डाण करेल. C55 प्रमाणेच PSLV-C56 ला त्याच्या कोर-अलोन मोडमध्ये कॉन्फिगर केले आहे. तो DS-SAR ३६० किलो वजनाचा उपग्रह ५३५ किमी उंचीवर एनईओ कक्षेत प्रक्षेपित करेल, असे ISRO म्हटले आहे.

DS-SAR उपग्रह विषयी…

DS-SAR उपग्रह DSTA (सिंगापूर सरकार) आणि ST अभियांत्रिकी यांच्यातील भागीदारी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. हा उपग्रह कार्यान्वित झाल्यानंतर तो सिंगापूर सरकारमधील विविध एजन्सीच्या उपग्रह इमेजरी आवश्यकतांना (satellite imagery requirements) सपोर्ट देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. एसटी अभियांत्रिकी त्याचा वापर त्यांच्या व्यावसायिक ग्राहकांसाठी मल्टी-मॉडल आणि हायर रिस्पॉन्सिव्हनेस इमेजरी आणि भू-स्थानिक सेवांसाठी करणार आहे.

DS-SAR वर इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) द्वारे विकसित केलेले सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) पेलोड आहे. हा DS-SAR ला हवामानाचे सर्व दिवस आणि रात्र कव्हरेज प्रदान करण्यास अनुमती देते.

इतर ६ उपग्रह कोणते?

१. VELOX-AM- हा एक २३ किलो वजनाचा तंत्रज्ञान प्रात्यक्षिक सूक्ष्म उपग्रह.
२. आर्केड अॅटमॉस्फेरिक कपलिंग अँड डायनॅमिक्स एक्सप्लोरर (ARCADE)- एक प्रायोगिक उपग्रह.
३. SCOOB-II- हा एक 3U नॅनोसॅटलाइट तंत्रज्ञान प्रात्यक्षिक पेलोड आहे.
४. NuLIoN by NuSpace- शहरी आणि दुर्गम अशा दोन्ही ठिकाणी अखंड IoT कनेक्टिव्हिटी सक्षम करणारा प्रगत 3U नॅनोसॅटलाइट.
५. गॅलेसिया-2 (Galassia-2)- एक 3U नॅनोसॅटलाइट आहे, जो पृथ्वीच्या कमी कक्षेत फिरत राहील.
६. ORB-12 STRIDER – हा उपग्रह आंतरराष्ट्रीय सहकार्याने विकसित केला आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT