Latest

Byju’s News: बायजू रवींद्रन यांनी अब्जाधीशाचे बिरूद गमावले, ‘फोर्ब्स’च्‍या यादीतून बाहेर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: फोर्ब्सने नुकतीच जगभरातील अब्जाधिशांची या वर्षीची यादी आणि त्यांची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. यामधून एडटेक कंपनी Byju's संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये Byju's चे संस्थापक बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्यावर घसरली आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Byju's News)

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, बायजू रवींद्रन यांची एकेकाळी यशच्या शिखरावर असणारी एडटेक कंपनी Byju's अनेक संकटांमुळे खिळखिळी झाली आहे. याचा परिणाम कंपनीचे संस्थापक मालक असलेले बायजू रवींद्रन यांच्या संपत्तीवर देखील झाला आहे. गेल्या वर्षभरात रवींद्रन यांची निव्वळ संपत्ती शून्यावर घसरली आहे. गेल्या एका वर्षापूर्वी रवींद्रन यांची निव्वळ संपत्ती 17,545 कोटी (२.१ डॉलर अब्ज ) इतकी होती; परंतु आता एडटेक कंपनीच्या अनेक आव्हानांमध्ये ती नाहीशी झाली आहे. (Byju's News)

गेल्या वर्षीच्या फोर्ब्सच्या यादीतून या वेळी केवळ चार अब्जाधिशांना वगळण्यात आले आहे. ज्यात माजी एडटेकचे मालर बायजू रवींद्रन यांचा समावेश आहे, ज्यांची फर्म बायजू अनेक संकटांमध्ये सापडली होती. त्याचे सध्याचे मूल्य हे ब्लॅकरॉकने १ डॉलर अब्ज इतके खाली आले आहे, जे 2022 मध्ये २२ डॉलर अब्ज मूल्यासह सर्वोच्च मूल्याचा एक अंश होता, असेही फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे. (Byju's News)

गेल्या काही दिवसापासून Byju's ला परकीय गुंतवणुकीमुळेही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणात ईडीकडून मोट्या प्रमाणात शोध मोहिम सुरू आहे. 'एनडीटीव्ही'च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, "  बायजू संस्थापकाच्या विरोधात लुकआउट परिपत्रक काढली आहे. तसेच ईडीने बायजूच्या मूळ कंपनी थिंक अँड लर्नला फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट अंतर्गत 9,362 कोटी रुपयांच्या कथित उल्लंघनाबद्दल कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली आहे.

सन २०११ मध्ये एडटेकमधील Byju's स्टर्टअप काही काळातच भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म बनले. सन २०२२ मध्ये कंपनीने २२ डॉलर अब्जचे लक्ष्य गाठले. Byju's ने शिक्षणप्रणाली मध्ये अमूलाग्र बदल केले. प्राथमिक शाळेपासून MBA पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची संधी या कंपनीने दिली. परंतु अलीकडील पैशाचे व्यवहार आणि कंपनी समस्यांमुळे Byju's ला आणि त्यांचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना मोठा फटका बसला.

हे ही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT