Latest

BYJU’s कडून मोठी नोकरकपात; तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : एज्युकेशन टेक्नॉलिजीमधील प्रमुख कंपनी BYJU's ने मोठी नोकरकपात केली आहे. कंपनीने अनेक विभागातील तब्बल १०००  कर्मचाऱ्यांच्या हातात नारळ देत घरी पाठवेल आहे. यासंदर्भातील वृत्त एडीटीव्हीने दिले आहे. कंपनी एका कायदेशीर कचाट्यात अडकली असतानाच, कंपनीकडून घेण्यात आलेला हा सर्वात मोठा निर्णय (BYJU's Lays Off) आहे.

BYJU's ही कंपनी सध्या १ अब्ज अमेरिकन डॉलर संदर्भात अमेरिकेतील सावकारांसोबत कायदेशीर लढा देत आहे. दरम्यान कंपनीकडून एवढ्या मोठ्या कर्मचारी कपातीची (BYJU's Lays Off) घोषणा करण्यात आली आहे. सध्या कंपनीची कर्मचारी संख्या सुमारे ५०,००० इतकी आहे.

BYJU's ने मार्च २०२३ पर्यंत कंपनीच्या फायद्यासाठी काही योजना आखल्या होत्या. कंपनीच्या खर्च कपात करण्यासाठी ऑप्टिमायझेशन प्रक्रिया राबवण्यात आली होती. सध्या करण्यात आलेली १ हजार कर्माचाऱ्यांची कपात (BYJU's Lays Off) ही देखील याच प्रक्रियेचा एक भाग आहे. कंपनीने ऑक्टोबर २०२२ पासून सहा महिन्यांत २५०० कर्मचार्‍यांपैकी सुमारे ५ टक्के कपात करण्याची घोषणा केली होती, असे देखील एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT