Latest

Butter Chicken : बटर चिकनचा शोध कसा लागला माहितीय का? 

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगात तीन प्रकारचे लोक आढळतात. बटर चिकन (Butter Chicken) प्रचंड आवडणारे, बटर चिकनचा किमतीचा जास्त विचार करणारे आणि बटर चिकनची कधीच आस्वाद न घेतलेले, असे तीन प्रकार पडतात. यापैकी तिसऱ्या प्रकरातील लोकांची दया वाटते. असो. पण, यानिमित्तानं बटर चिकनचा इतिहास जाणून घेऊ…

साधारणपणे भारताची फाळणी होण्यापूर्वी ही गोष्ट आहे. पेशावरमध्ये मोखा सिंग यांच्या मालकीचा 'मुखे दा धाबा', असं एक छोटंखानी हाॅटेल होतं. तिथं कुंदनलाल गुजराल हा तरूण काम करत होता. आता त्यांचा नातू मोनिश गुजराल सांगतो की, "आज खव्वयांना जी 'तंदूरी चिकन' डिश आवडते ना… तिचा शोध लावण्यात कुंदनलाल गुजराल यांचा मोठा वाटा आहे."

दरम्यानच्या काळात मोखा सिंग यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांनी तो धाबा गुजराल यांना विकला. त्यानंतर गुजराल यांनी त्या धाब्याचे नाव 'मोती महल' ठेवले. पक्के व्यावसायिक असणाऱ्या कुंदन लाल गुजराल यांनी विचार केला की, तंदूरी चिकन ठेल्याबाहेर दिवसभर अडकविल्यामुळे सुकण्याची शक्यता जास्त असते.

अशात त्यांना भन्नाट कल्पना सुचली की, टोमॅटो ग्रेव्ही, बटर क्रिम आणि इतर मसाले एकत्र केले आणि तंदूर चिकनचे तुकडे त्यात मिक्स केले. यातूनच 'बटर चिकन'चा (Butter Chicken) शोध लागला. भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली, तेव्हा कुंदनलाल गुजराल दिल्लीला निघून आले.

मोती महल धाब्यातील बटर चिकन आणि तंदूर चिकन, हे पदार्थ भारतात घेऊन आले. त्यांनी आपल्या हाॅटेलच्या दर्यागंज आणि इतर ठिकाणी हाॅटेलच्या शाखा काढल्या. आता ७० वर्षानंतरही हे पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. आज त्यांचा नातू मोनिश गुजराल हे हाॅटेल सांभाळतात.

आज कुणाही हाॅटेलमध्ये गेल्यानंतर पार्टी एन्जाॅय करण्यासाठी तंदूर चिकन आणि बटर चिकनची ऑर्डर सहज दिली जाते. थोडीशी गोडसर असणारी बटर चिकनची डिश खव्वयांच्या आवडीची झाली आहे. बटर चिकन या पदार्थ्याच्या पाठीमागे असा इंटरेस्टिंग इतिहास आहे.

पहा व्हिडीओ : चटकदार लोणचे कसे तयार करायचे? 

SCROLL FOR NEXT