Latest

पंढरपूर-कराड रस्त्यावर बस-ट्रकचा अपघात; २ ठार, ६ जखमी

मोहन कारंडे

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरहून आटपाडीकडे जाणार्‍या एसटी बसला पंढरपूरकडे भरधाव वेगाने येणार्‍या मालट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात सोनके येथे आज (दि २५) सकाळी ११ च्या सुमारास झाला.

अधिक माहिती अशी की, पंढरपूरहून आटपाडीकडे जाणार्‍या एसटी बसला समोरुन येणार्‍या ट्रकने (क्र. एम.एच.50,2166) सोनके (ता.पंढरपूर) येथे जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकच्या व एसटीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात २ प्रवाशी जागीच ठार झाले असून सुमारे ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT