दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिवाळी म्हटली दिव्यांच्या रोषणाई सोबत फटाक्यांच्या आतषबाजीची धूम असते. लहानांपासून थोरांपर्यंत फटाक्यांच्या खरेदीला प्राधान्य दिला जात असतो. पण, तुम्ही दिल्लीकर असाल तर मात्र यंदा तुम्हाला दिवाळीत फटाके उडविता येणार नाहीत. हो, दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांनी दिवाळीत फटाके फोडणाऱ्यास ६ महिन्यांची कैद आणि २०० रुपयांपर्यंतचा दंड केला जाईल असा आदेश काढला आहे. त्यामुळे यंदा दिल्लीकरांना दिवाळीत फटाके फोडणे चांगलेच महागात पडू शकते. (Bursting Crackers Ban In Delhi)
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी सांगितले की, दिवाळीत दिल्लीमध्ये फटाके फोडले तर ६ महिन्यांची कैद आणि २०० रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राजधानी दिल्ली फटाक्यांचे उत्पादन करणे, त्याचा साठा करणे आणि विक्री करणे यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्यास ५००० रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांची शिक्षा होईल असे सांगितले. दिल्ली सरकारने सप्टेंबरमध्ये अध्यादेश काढला होता की, दिल्लीमध्ये जानेवारीतपर्यंत सर्व प्रकारचे फटाके उत्पादन आणि त्याच्या विक्री व खरेदीवर बंदी घातली आहे. (Bursting Crackers Ban In Delhi)
मागील वर्षांपासून दिल्लीमध्ये दिवाळीत फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे. मंत्री राय यांनी सांगितले की, २१ ऑक्टोंबर पासून 'दीये जलाओ पटाखे नहीं' या स्वरुपाचे जनजागृती अभियान दिल्ली सुरु केले जाणार आहे. दिल्ली सरकारने शुक्रवारी कनॉट परिसरातील सेंट्रल पार्कमध्ये ५१ हजार दिवे लावण्याचा उपक्रम राबविला. (Bursting Crackers Ban In Delhi)
पर्यावरणमंत्र्यांनी सांगितले की, पटाक्यांवरील निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण दिल्लीमध्ये ४०८ टीम तयार करण्यात आले आहे. तसेच दिल्लीच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अखत्यारीत २१० टीम तयार करण्यात आल्या आहेत. यावेळी मंत्री राय यांनी सांगितले की, आतापर्यंत नियमांचे उल्लघन झाल्याच्या १८८ तक्रारी दाखल झाल्यात आहेत. तर १६ ऑक्टोंबरपर्यंत २९१७ किलो फटाके जप्त करण्यात आले आहेत.
अधिक वाचा :