Latest

Buldhana Accident : बुलढाणा: नांदुरा तालुक्यात ट्रक झोपडीत घुसला; ५ मजूर ठार, ५ जण जखमी

अविनाश सुतार

बुलढाणा : पुढारी वृत्तसेवा : नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ६ च्या उड्डाण पुलाजवळील एका झोपडीत माल वाहतूक करणारा आयशर ट्रक घुसला. या दुर्घटनेत ५ मजूर ठार झाले. तर ५ जण जखमी झाले. ही घडना आज (दि.२) पहाटे ५ च्या सुमारास घडली.

सध्या या महामार्गाचे काम सुरू आहे. मृत मजूर या कामावर होते. प्रकाश मकू धांडेकर (वय २६), पंकज तुळशीराम जांभेकर (वय १९) राजाराम दादू जांभेकर (वय ३५), अभिषेक रमेश जांभेकर (वय १८, सर्व रा. मोरगड, ता. चिखलदरा, जि.अमरावती) अशी मृत मजुरांची नावे आहेत.

तर दीपक पणजी बेलसरे, कमल रमेश जांबेकर, वर बजे, शाम भास्कर (सर्व रा. मोरगड), भुया भुयार (रा.बोरी मतोली, तहसील गढवा) अक्षय कुमार, श्री कुमार भैय्या रा. चिनीया, सतपाल कुमार मलिकचंद (रा. बोरी मातोली) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर मलकापूर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT