Latest

Budget 2024 Teenage Girls: गर्भाशय मुखाचा कॅन्‍सर टाळण्यासाठी अर्थसंकल्‍पात ‘ही’ तरतूद

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज १ फेब्रुवारीला संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी देशातील युवतींच्या आरोग्यासंबंधी प्रतिबंधात्मक विशेष तरतूदीची घोषणा अर्थमंत्री सितारमण यांनी केली. या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर सरकारकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना लसीकरण करण्यास प्रोत्साहन देईल, अशी घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत केली. (Budget 2024 Teenage Girls)

आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांना 'आयुष्मान भारत'चे कवच

आयुष्मान भारत अंतर्गत सर्व आशा वर्कर्स, सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आरोग्य सेवा कवच देण्यात येणार आहे, अशी घोषणाही निर्मला सीतारमण यांनी केली. (Budget 2024 Teenage Girls)

उच्च शिक्षणातील महिलांचा टक्का वाढला

गेल्या 10 वर्षात उच्च शिक्षणातील महिलांची नोंदणी 28% वाढली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अभ्यासक्रमांमध्ये, मुली आणि महिलांची नोंदणी 43% आहे, जी जगातील सर्वाधिक आहे. या सर्व गोष्टी महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या वाढत्या सहभागातून दिसून येत आहे, असे देखील अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडणीवेळी स्पष्ट केले आहे. (Budget 2024 Teenage Girls)

'या' योजनांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान

तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवून, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये एक तृतीयांश महिला आरक्षण, ग्रामीण भागात एकट्या किंवा संयुक्त मालक म्हणून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत  70% हून अधिक महिलांना घरे या माध्यमातून देशातील महिलांचा सन्मान वाढवला आहे, असे देखील अर्थमंत्री म्हणाल्या.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT