Latest

Budget 2024 : सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प : डॉ. आशिष देशमुख

Shambhuraj Pachindre

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गरीब, महिला, तरुण, शेतकरी, व्यापारी, उद्योगधंदे व रोजगार यांच्यावर लक्ष केंद्रित करणारा आणि सर्वांगीण विकासाचा, सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असून भारत देश लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल यात शंका नाही असा विश्वास माजी आमदार डॉ आशीष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. (Budget 2024)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात आर्थिक क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे बचत आणि गुंतवणूक अधिक कार्यक्षम झाली आहे. सामान्य जनता आणि समाजातील सर्व घटकांसाठी हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाला पूरक आहे. पंतप्रधान आवास योजना, महिलांना प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन, महिलांना संसदेत आरक्षण, पीएम मुद्रा योजना, स्किल इंडिया मिशन, शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार, पीएम किसान सन्मान योजना, विश्वकर्मा योजना, पीएम स्वनिधी योजना, पीएम जनधन योजना, आरोग्यासाठी आयुष्मान भारत योजना, पर्यटन क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक यामुळे देशाचा सर्वांगीण विकास होत आहे. (Budget 2024)

गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. 2047 पर्यंत विकसित देश होण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते,सह-मुख्य प्रवक्ताआणि ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT