Latest

Budget 2023 : दलितांना विकासाची संधी नाकारणारा अर्थसंकल्प – डॉ. नितीन राऊत

अमृता चौगुले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प देशातील दलितांना विकासाची संधी नाकारणारा असल्याची टीका माजी ऊर्जा मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. (Budget 2023)

दलित महिलांसाठीच्या योजनांवरील, रोजगार हमी योजनेवरील तरतूदीही कमी करण्यात आल्या आहेत. शेतकरी आणि महिलांसाठी नवे काहीही या अर्थसंकल्पात नाही,'' अशा शब्दात डॉ. राऊत यांनी मोदी सरकारच्या अर्ज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले. (Budget 2023)

"अच्छे दिनचे स्वप्न दाखवित मोदी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या ८ वर्षात देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचेच काम या सरकारने केले. देशाच्या या स्थितीला अमृत काळ कसे म्हणता येईल? भाजपच्या दलितव्देषी भूमिकेचा प्रभाव नेहमीच या सरकारच्या धोरणात दिसत राहिला आहे. सातत्याने दलितांसाठीच्या योजनांवरील अर्थसंकल्पीय तरतूदी कमी करणे, दलितांवर अत्याचार रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले न उचलणे ही भाजप आणि मोदी सरकारची ओळख झाली आहे," अशी टीका डॉ. राऊत यांनी केली.

दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीची घोषणा करून जनतेला फसविणा-या मोदी सरकारने या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी काहीही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रतिव्यक्ती उत्पन्न दुप्पट झाल्याचे अर्थमंत्री म्हणत असल्यातरी प्रत्यक्षात सर्वसामान्यांचे नव्हे तर मोदी सरकारच्या जवळ असलेल्या मूठभर भांडवलदारांचे उत्पन्न दुप्पट झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT