Latest

Brij Bhushan Singh | WFI अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी SIT स्थापन, अनेकांचे जबाब नोंदवले

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : लैंगिक छळाचा आरोप असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर याप्रकरणी चौकशी करण्यासाठी आज(दि.१२) सहा पोलिस पथकांसह एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महिला पोलिस आयुक्तांच्या देखरेखीखाली एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली, याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Brij Bhushan Singh)

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, WFI अध्यक्ष बृजभूषण सिंग यांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला पोलिस अधिकार्‍यांसह सहा पोलिस पथकांचा (Brij Bhushan Singh) समावेश आहे. तसेच एका महिला डीसीपीच्या देखरेखीखाली दहा जणांची टीम तयार करण्यात आली आहे. या टीमकडून कुस्तीपटूंसह, संशयित आरोपी WFI अध्यक्ष बृजभूषण सिंग, WFI चे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचे जबाब नोदवले आहेत, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात बृजभूषण सिंग यांच्यावर एफआयआर नोंदवल्यानंतर फिर्यादी अल्पवयीन महिला कुस्तीपटूचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. यानंतर अन्य कुस्तीपटूंचेदेखील जबाब नोंदवण्यात आले आहेत. पुढे WFI चे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसाकडून मिळाली आहे. कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या FIR मध्ये याप्रकरणात विनोद तोमर हे देखील संशयित आरोपी आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Brij Bhushan Singh: बृजभूषण सिंह यांचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवला

लैंगिक शोषणाचा आरोप झालेले भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष [डब्ल्यूएफआय] खा. बृजभूषण सिंग यांचा देखील जबाब नोंदवून घेण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी (दि.१२) दिली. जबाबादरम्यान सिंग यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असल्याचे समजते. दरम्यान त्यांच्याकडून काही कागदपत्रांची मागणी पोलिसांनी केली आहे.

दिल्ली पोलिसांकडून याप्रकरणातील चौकशीसाठी 'या' राज्यात दौरा

कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर आणि कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने बृजभूषण सिंग यांची आगामी काळातही चौकशी होणार आहे. पोलिसांच्या पथकांनी अलिकडेच तपासासाठी उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक आणि हरियाणाचा दौरा केला होता. देशाबाहेर जरी आरोप झाले, तरीही आम्ही संबंधित एजन्सीच्या संपर्कात असल्याचे देखील दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT