Latest

Brij Bhushan On WFI Suspension : WFI कार्यकारिणी निलंबनावर बृजभूषण सिंह म्हणाले, “मी कुस्ती खेळाच्या…”

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क:  केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) ची नवीन कार्यकारिणीचे आज निलंबिन केले. तसेच या संघटनेच्‍या सर्व निर्णयांना स्थगिती दिली. या निर्णयावर भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार भृजभूषण शरण सिंह यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. आज 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना बृजभूषण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Brij Bhushan On WFI Suspension)

क्रीडा मंत्र्यालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना बृजभूषण म्हणाले की, मी कुस्ती या खेळाच्या राजकारणापासून दूरच राहीन. कुस्तीसंदर्भात जे काही करायचे आहे किंवा निर्णय घ्यायचे आहेत ते सर्व नव्याने निर्माण करण्यात येणारी कार्यकारिणीच घेईल. माझाशी त्‍यांचा काहीही संबंध नाही. भाजप अध्यक्ष जेपी. नड्डा यांच्या भेटीनंतर ते आज (दि.२४) माध्यमांशी बोलत होते. (Brij Bhushan On WFI Suspension)

Brij Bhushan On WFI Suspension:  आम्‍ही अकादमी बंद करणार नाही

मी काम करत राहीन. आम्ही क्रीडा अकादमी चालवत राहू. या अकादमीमध्ये सध्या १०० ते १५० मुले प्रशिक्षण घेत आहेत. तसेच मी स्वत: कुस्ती खेळली आहे. कुस्तीच्या बळावरच मी आज इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे आम्ही आमची अकादमी बंद करणार नाही, असे देखील त्‍यांनी स्पष्ट केले आहे. (Brij Bhushan On WFI Suspension)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT