Latest

ब्रेकींग! लासलगावी कांद्याच्या माळा घालून केंद्राचा निषेध, १०ते १२ जण ताब्यात

अंजली राऊत

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेसाठी निघालेल्या त्रस्त कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी म्हणून कांद्याच्या माळा घालून संतप्त घोषणा दिल्या. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पिंपळगाव बसवंत येथे आज बुधवारी (दि. १५) पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. मोदींच्या सभेसाठी ग्रामीण पोलिसांनी सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तरीही कांदा उत्पादकांनी त्याला न जुमानता गळ्यात कांद्याच्या माळा घालून आपला रोष व्यक्त केला आहे.

कांदा निर्यातबंदी (onion Export Ban) विरोधात जोरदार घोषणा देत लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, डॉक्टर सुजित गुंजाळ, शिवा सुराशे, डॉक्टर विकास चांदर, विकास रायते, महेश होळकर, संतोष पानगव्हाणे, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील, भरत होळकर, राहुल शेजवळ, मयूर बोरा यांच्यासह दहा ते बारा जणांना लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब खंडाळ पोलीस कर्मचारी सुजित बारगळ यांनी ताब्यात घेतले आणि पोलीस कार्यालयात आणले आहे. मोदींच्या सभेपर्यंत या लोकांना पोलीस कार्यालयातच अटक करून अडकवून ठेवण्यात येईल असे समजते. दरम्यान लासलगाव पोलीसांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणाऱ्या शरीर विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्याबाबत प्रतिबंधात्मक नोटीसा दिल्याची माहिती हाती आली आहे.

  • लासलगावी कांद्याच्या माळा घालून केंद्राचा निषेध
  • मुंबई बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकरांसह १०ते १२ जण ताब्यात
  • मोदींच्या सभेपूर्वी लासलगावी निर्यातबंदी विरोधात जोरदार घोषणा
SCROLL FOR NEXT