Latest

Boxer Vijender Singh | काँग्रेसला धक्का! बॉक्सर विजेंदर सिंह आता ‘भाजप’च्या रिंगमध्ये, हाती घेतले कमळ

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ऑलिम्पिक पदक विजेते बॉक्सर आणि काँग्रेस नेते विजेंदर सिंह (Boxer and Congress leader Vijender Singh)  यांनी आज बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. विजेंदर सिंह यांनी आज दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बॉक्सर विजेंदर सिंह यांनी म्हटले, "मी आज देशाच्या विकासासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे."

बॉक्सर विजेंद्रर यांनी X वर एका ओळीची पोस्ट केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी अनेक अटकळी अटकळी बांधण्यात आल्या. 'जनतेची इच्छा असेल तिथे मी तयार आहे.' असे त्यांनी म्हटले होते.

२०१९ मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या विजेंदर सिंह यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सोमोरे जावे लागले. तरीही ते काँग्रेससोबत कायम राहिले. त्यानंतर त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये सोशल मीडिया पोस्टद्वारे राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. पण आता पुन्हा त्यांनी राजकारणात वापसी केली आहे.

विजेंदर यांनी २०१९ मध्ये काँग्रेसकडून दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवली होती. पण भाजपच्या रमेश विधूडी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर विजेंदरची राजकारणातील सक्रियता कमी झाली. २०२३ मध्ये त्यांनी राजकारणाला रामराम केला होता.

मथुरा येथून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. येथून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा निवडणूक लढवत आहेत. विजेंदर सिंह हे हरियाणातील राजकारणात मोठा प्रभाव असलेल्या जाट समुदायातील आहेत.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT