Latest

Bomb near Golden Temple Amritsar : ‘सुवर्ण मंदिराजवळ बॉम्ब’, पंजाबमध्ये रेड अलर्ट; एका निहंगसह ४ अल्पवयीन ताब्यात

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bomb near Golden Temple Amritsar : अमृतसर येथील सुवर्ण मंदिर/श्री हरमंदिर साहिब जवळ एक दोन नव्हे तर चार बॉम्ब ठेवले आहेत, अशी सूचना पंजाब पोलिसांना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 1.30 वाजता मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून पोलिस कंट्रोलरूमला कॉल करून याविषयी माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण पंजाबमध्ये रेड अलर्ट देण्यात आला. तसेच पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक पथकांसह श्री हरमंदिर साहेब जवळ शोध घेण्यास सुरुवात केली. वाचा सविस्तर बातमी…

Bomb near Golden Temple Amritsar : कंट्रोल रूमला कॉल; बॉम्बस्फोट रोखण्याचे पोलिसांना आव्हान

अमृतसर पोलिस कंट्रोल रूमला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून सचखंड श्री हरमंदिर साहिबच्या जवळ चार बॉम्ब लपवून ठेवले आहेत, असे सांगितले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटे 1.30 च्या सुमारास हा कॉल पोलिसांना आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना बॉम्बचे धमाके रोखण्यासाठी उघड आव्हान दिले. कॉलर म्हणाला, " बम के धमाकों को अगर रोक सकते हो तो रोक लो" नंतर फोन कट केला.

दरम्यान, कॉल आल्यानंतर कंट्रोल रूम इंचार्ज ने पोलिस आयुक्त नोनिहाल सिंह यांना तातडीने याची माहिती दिली. आणि तातडीने हालचाली सुरू केल्या. अमृतसर पोलिस १० बॉम्ब निरोधक पथकांना घेऊन हरमंदिर साहिब येथे पोहोचले. तसेच पूर्ण पंजाबमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला.

Bomb near Golden Temple Amritsar : …शोध घेतला पण बॉम्ब सापडले नाही

बॉम्ब निरोधक पथके आणि पोलिसांनी संपूर्ण मंदिर परिसर पिंजून काढला. मात्र पहाटे ४ वाजेपर्यंत शोध घेऊनही पोलिस आणि बॉम्ब स्कॉड पथकांना कोठेही बॉम्ब किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. दरम्यान, तसेच या निनावी कॉल करणाऱ्या व्यक्तीचा सायबर पोलिसांनी शोध घेतला.

अमृतसर सायबर पोलिसांनी ज्या मोबाईल वरून कॉल आला होता. तो नंबर ट्रेस करून त्याचे लोकेशन सर्च केले. याप्रकरणी पोलिसांनी एका 20 वर्षीय निहंग सहित काही अल्पयीन मुलांना पहाटे पाचच्या सुमारास ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी फक्त खोडसाळपणे हा कॉल केला होता. ताब्यात घेतलेला आरोपी निहंग हा श्री हरमंदिर साहिब जवळ स्थित बांसा वाला बाजाराजवळ राहणारा असून त्याच्या सोबत ४ अल्पवयीन मुले देखील सहभागी होते. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले असून पोलिस त्यांच्या कुटुंबीयांची देखील चौकशी करत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केली नाही. आज शनिवारी दुपारपर्यंत पोलिस याबाबत प्रेस कॉन्फरन्स करू शकतात. Bomb near Amritsar Golden Temple

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT