Latest

Article 370 Review : यामी गौतम- प्रियामणीवरील हटेना नजर, ॲक्शन सीनचा तडका

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि प्रियामणी याच्या धमाकेदार 'आर्टिकल 370' ( Article 370) नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केलं आहे. (Article 370 Review) चित्रपटातील दरदार अभिनयासोबत सत्य घटनेवर आधारित कथा चित्रपटात उत्तमरित्या दाखविली आहे. गेल्या दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचा उल्लेख केल्या आणि चित्रपटाची क्रेझ आणखी वाढत गेली. अॅक्सन सीनने भरलेल्या या चित्रपटाने आज सकाळपासूनच सिनेमा गृहात दस्तक दिली आणि चाहत्याचा ओघ सिनेमा गृहाकडे वाढला. दरम्यान या चित्रपटाबद्दल चाहत्यांकडून अनेक रिव्ह्यू समोर येत आहे. (Article 370 Review)

संबंधित बातम्या 

'आर्टिकल 370' ( Article 370) चित्रपटाची सुरुवात बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या व्हॉईस ओव्हरने होते. ज्यात तो जम्मू- काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात कसा जातो आणि कलम ३७० कसे लागू करण्यात आले याची माहिती देतो. चित्रपटाची कथा २०१६ मधील असून स्थानिक एजंट आणि गुप्तचर क्षेत्र अधिकारी जुनी हक्सर (यामी गौतम धर) आणि काश्मीरच्या अशांततेनंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे नेतृत्व करण्यासाठी पीएमओचे सचिव राजेश्वरी प्रियमणी स्मानिथन यांची गुप्तचर विभागात भरती केली जाते. यानंतर खऱ्या अर्थाने चित्रपटातील संघर्षाची कथा दाखविण्यात आली आहे. सिनेमा गृहात चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांनी त्यातील कलाकारांच्या अभिनयासोबत भरभरून कौतुक केलं आहे.

चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी म्हटलं आहे की, 'चित्रपटाचा पूर्वार्ध थोडा स्लो आहे, मात्र, नंतर चित्रपटात भारदस्त अभिनय पोहायला मिळतोय'. '३० मिनिटांचा चित्रपटाचा क्लायमॅक्स खूपच चांगला आहे'. 'जबरदस्त डॉयलॉग लिहिले गेलं आहेत'. 'प्रभावी लेखनासह उत्तम पटकथा आहे'. 'शिवकुमार व्ही पॅनिकलचे संपादन प्रशंसनीय आहे'. "कलम 370′ चे बहुतेक भाग वास्तविक घटनांनी प्रेरित असले तरी, निर्मात्यांनी यामी आणि तिच्या जोडीदारामधील संवाद खूपच प्रभावी मांडले आहेत.'

यासोबत 'अभिनेत्री यामीने खूप दमदार काम केलं आहे. तिने चित्रपटात ॲक्शन आणि डायलॉग अगदी चोख बजावली आहेत'. 'विशेषत: जेव्हा यामी तिच्या गणवेशातील सहकारी पुरुषांसाठी उभी असते तेव्हाचे दृश्य'. प्रियामणीने यामीसारखा दमदार परफॉर्मन्स दिला आहे. दोन्ही कलाकारांनी मिळून आपल्या मेहनतीने हा चित्रपट खास बनवला आहे. हा चित्रपट दिग्दर्शकांना महिलांना सशक्त बनवण्यासाठी प्रवृत्त करेल. असेही त्यांनी म्हटलं आहे.

या चित्रपटातील यामी गौतमी आणि प्रियामणीसोबत अनेक कलाकारांचेही चाहत्यांनी अभिनंदन करताना कॉमेन्टस केल्या आहेत. अरुण गोविल यांनी पीएम मोदींची भूमिका साकारली असून किरण करमरकर यांनी अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. 'कलम 370' हा चित्रपट देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रकरणांपैकी एक आहे. हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणार आहे. ( Article 370 Review )

SCROLL FOR NEXT