Latest

Kangana Ranaut : ‘खलिस्तान’विरोधात कंगना भडकली; म्‍हणाली, “लाज वाटते…”

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ( Kangana Ranaut ) तिच्या सडेतोड आणि रोखठोक मतांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने खलिस्तानविरोधातील पोस्टनं सोशल मीडियावर शेअर केले असून,  तिच्‍या रोखठोक भूमिकेमुळे बॉलीवूडमध्‍ये चर्चेला उधाण आलं आहे.

कंगनाने ( Kangana Ranaut ) तिच्या फेसबुक अकाऊंटवरएक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तीन वर्षांपूर्वीची घटना सांगत स्वत: ला कसा त्रास  बाबत खुलासा केला आहे. कंगनाने पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "जेव्हा मी तीन वर्षांपूर्वी खलिस्तानविरोधात बोलले होते, तेव्हा मला सर्व ब्रँडने जाहिरातीतून काढून टाकले होते. तसेच लाखो युजर्सनी मला सोशल मीडियावर अनफॉलो करत माझ्या फोटोंसह पोस्ट डिलीट केल्या होत्‍या. याशिवाय माझ्यावर पोस्ट न करण्यास पूर्णपणे बंदी घातली गेली. या सर्व त्रासातून मी गेले आहे."

आज पंजाबमधील दहशत पाहून त्यांना लाज वाटते का?, त्यांनी चूक केली असे त्यांना स्वत: ला वाटते आहे का?… थोडी जरी माणुसकी असेल तर नक्कीच लाज वाटेल; पण संरक्षण असेल तर त्यांचे कृत्‍य धर्माचा विनाश आणि अधर्माचा विजय आहे तर मग लाज उरणार नाही… असेही तिने पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे. अमृतसरमधील अजनाळा पोलिस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी 'वारीस पंजाब डे' या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याने धिंगाणा घातला होता. यानंतर आता कंगणाने पोस्‍ट करत खलिस्‍तान समर्थकांना खडेबोल सुनावले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT