Latest

Ileana D’Cruz : इलियानानं पहिल्यादा फ्लॉन्ट केलं बेबी बंप

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz) लवकरच आई होणार आहे. इलियाने याबाबतची गुडन्यूज गेल्या एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली होती. यानंतर आता तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोशूट केले आहे. इलियानाच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत हार्ट आणि फायरच्या ईमोजींची पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz) ने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे तीन फोटो शेअर केले आहेत.े यावेळी इलियानाने थाय- हाय स्लिट स्लिव्हलेस ब्लॅक कलरचा गाऊन परिधान केला आहे. इलियाना प्रेंग्नन्सीदरम्यान खूपच आनंदीत आणि उत्साहित असल्याचे दिसून येत आहे. या फोटोला खास करून तिने 'बंप अलर्ट।' अशी कॅप्शन लिहिली आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

इलियानाने अद्याप लग्न केलेले नाही. गेल्या एप्रिल महिन्यात तिने प्रेग्नेंसीची घोषणा केल्याने चाहत्यांना धक्का बसला. यानंतर सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लढविले जावू लागले.

इलियानाने बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीत अभिनयाचा ठसा उमठविला. २००६ मध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून तिने पहिल्यांदा डेब्यू केला. तर इलियाना आगामी 'अनफेअर अँड लव्हली' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात इलियानासोबत अभिनेता रणदीप हुड्डा भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT