Latest

Sitaare Zameen Par : देशमुखांची सून जेनेलिया आमिरच्या चित्रपटात

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा गेल्या वर्षी 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने अभिनयातून ब्रेक घेत कुटुंबासोबत टाईम्स स्पेंड केला. यानंतर आता आमिरने त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' ( Sitaare Zameen Par ) या चित्रपटाची घोषणा केली. यामुळे आमिर खानला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांच्या आनंद द्विगुणीत झाला आहे. हा चित्रपट आधीचा 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. खास करून या चित्रपटात महाराष्ट्राची लाडकी सून बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा दिसणार आहे.

संबधित बातम्या 

आमीरने 'लाल सिंग चड्ढा' सुपरफ्लॉप झाल्यानंतर तो त्याच्या कुंटूबियासोबत टाईम्स स्पेंड करत होता. यानंतर त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. यानंतर आता त्याने चाहत्याचा आनंद द्विगुणीत करत आगामी Sitaare Zameen Par  चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव 'सितारे जमीन पर' असून तो त्याच्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सिक्वेल असल्याची माहिती समोर आली आहे.

याच दरम्यान मराठी 'वेड' चित्रपट गाजवणारी जेनेलियाने डिसूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत आमिर खानसोबत काम करणार असल्याची माहिती दिली आहे. यावरून आगामी 'सितारे जमीन पर' चित्रपटात जेनेलिया मुख्य भूमिकेत असणार आहे. याशिवाय दिग्दर्शकांनी चित्रपटाबद्दल तिच्याशी बोलणे झाले असून तिने होकार दिल्याचेही समजले आहे. चित्रपटाची निर्मिती आमिर खान करणार आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलं की, आमिर खान प्रॉडक्शनने चित्रपटाच्या रिलीज डेट लॉक केली आहे. सध्या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन चालू असल्याचे माहिती त्यांनी दिली आहे. या चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया डिसूझा दोघेजण पहिल्यांदा स्किन शेअर करणार आहेत.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT