Latest

Anant-Radhika Pre Wedding : प्री-वेडिंगला प्रेग्नंट दीपिकावर खिळल्या नजरा; ‘दिल धडकने दो’वर कल्ला (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे प्री-वेडिंग नुकतेच गुजरातमधील जामनगर येथे पार पडत आहे. या प्री-वेडिंगला देश- विदेसातील मान्यवरांसोबत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्सनी दिमाकात हजेरी लावली आहे. दरम्यान एकिकडे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्यावर डान्स केल्याने चर्चेत आले आहेत. तर दुसरीकडे याच सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने धमाकेदार परफार्मन्स सादर केल्याने तिच्यावर सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. ( Anant-Radhika Pre Wedding )

संबंधित बातम्या  

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान, सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर, नव्या नंदा, करीना कपूर, सैफ अली खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, विकी कौशल, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जौहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर या सेलिब्रिटींनी दिमाखात हजेरी लावली. मात्र, तीन खानच्या धमाकेदारक डान्ससोबत प्रेग्नंट असलेल्या दीपिका पादुकोणवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या. कारण, दीपिकाने यावेळी धमाकेदार डान्स केलाय.

काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने लग्नाच्या सहा वर्षांनंतर आता आई-बाबा होणार असल्याची माहिती एक पोस्ट शेअर करून दिली होती. यानंतर लगेच हे कपल अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहल्याला पोहोचले आहेत. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी दीपिका रिहानाची कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसली. यानंतर दुसऱ्या दिवशी दीपिकाने रणवीरसोबत 'दिल धडकने दो' या चित्रपटातील 'गल्लां गूडिया' गाण्यावर डान्स केला.

या गाण्यानंतर प्रेग्नंट दीपिकाने डान्स केल्याने आणि दीपिका-रणवीरच्या रॉयल लूकने तिच्यावर उपस्थिताच्या नजरा खिळल्या. यावेळी दीपिकाने सोनेरी रंगाचा लेहेंगा आणि रणवीरने ब्लॅक रंगाचा शूट परिधान केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ( Anant-Radhika Pre Wedding )

(video : varindertchawla instagram वरून साभार)

SCROLL FOR NEXT