Latest

Dream Girl २ : आयुष्मानच्या ‘ड्रिम गर्ल २’ ची रिलीज डेट टळली, ‘या’ दिवशी येणार भेटीस

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेगळ्या स्टाईलने सर्वांना प्रभावित करणारा बॉलिवूड अभिनेत्री आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी 'ड्रीम गर्ल २' ( Dream Girl २ ) या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आयुष्मानने चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने चाहत्यात निराशा पसरली आहेत.

आयुष्मान खुरानाने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत आगामी 'ड्रीम गर्ल २' ( Dream Girl २ ) चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आल्याची माहिती दिली आहे. याआधी हा चित्रपट ७ जुलै रोजी थिअटरमध्ये चाहत्यांच्या भेटीस येणार होता. मात्र, आता हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान त्याने चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम करण्याची गरज असल्याने रिलीजला उशीर होत असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच चित्रपटासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार असल्याने दिलगिरीही व्यक्त केली आहे.

आयुष्मानने त्याच्या पोस्टमध्ये 'माझ्या प्रिय चाहत्यानों, चार वर्षांनंतर तुमच्या हृदयाचा टेलीफोन पुन्हा वाजणार आहे. आता यासाठी जोरदार तयारी झाली आहे. शानदार, धमाकेदार भूमिका तुमच्यासाठी घेवून आलोय, यासाठी तोडा वेळ लागणार आहे. तुम्ही मात्र, माझ्या पूजाच्या भूमिकेवर भरपूर प्रेम करत रहा. पूजा तुमच्या भेटीस याआधी ७ तारखेला येणार होती, मात्र, आता ती २५ ऑगस्टला येत आहे. ड्रीम गर्ल २, २५ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. – तुमची लाडकी पूजा.' असे लिहिले आहे.

या चित्रपटात आयुष्मान पूजा आणि करन या दोघांची भूमिका साकारणार आहे. 'ड्रीम गर्ल २' हा २०१९ मध्ये रिलीज झालेल्या सुपरहिट चित्रपट 'ड्रीम गर्ल' चा सिक्वेल आहे. हा चित्रपट चाहत्यांना खूपच आवडला. 'ड्रीम गर्ल २' चित्रपटात आयुष्मानसोबत अनन्या पांडे, अनु कपूर, परेश रावल, असरानी, ​​मनजोत सिंग आणि विजय राज यासारखे अनेक मुख्य कलाकार आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT