Latest

Drishyam 2 : अजयचा ‘दृश्यम २’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याचा 'दृश्यम 2' ( Drishyam 2 ) हा चित्रपट आज शुक्रवारी (दि.18) सिनेमागृहात रिलीज झाला. यानंतर चाहत्यांकडून चित्रपटाबद्दल समिश्र प्रितिक्रिया मिळाल्या. काहींनी चित्रपटातील डॉयलॉगचे भरभरून कौतुक केले तर काहींना चित्रपटातील काही भूमिका पसंतीस उतरल्या नाहीत. परंतु, 'दृश्यम २' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा असतानाच आता एक मोठा फटका बसला आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी ऑईलाईन लीक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तमिळ रॉकर्स आणि फिल्मझिला या वेबसाइट्सवर 'दृश्यम २' ( Drishyam 2 ) प्रदर्शनाआधीच ऑईलाईन लीक करण्यात आला आहे. त्यामुळे अभिनेता अजय देवगणच्या या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरच्या कमाईला मोठा फटका बसू शकतो. तर 'दृश्यम २' चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे निर्मात्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अभिनेता अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन यांचा 'दृश्यम २' हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करील अशी अपेक्षा होती. परंतु, प्रदर्शनापूर्वीच ऑनलाईन लीक झाल्याने निर्मात्याची निराशा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून ४.५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. 'दृश्यम २' हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT