Latest

Boiler Blast : बिहारमध्‍ये नूडल्स कंपनीमध्ये स्फोट ६ कामगार जागीच ठार

backup backup

मुजफ्फरपूर ; पुढारी ऑनलाईन : बिहारच्या मुजफ्फरपूर औद्योगीक वसाहतीत आज (दि.२६) सकाळी एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, यामध्ये ६ कामगार जागीच ठार झाले. १० जण गंभीर जखमी झाले. नूडल्स आणि नमकीन पदार्थ बनवणारी ही कंपनी आहे. (Boiler Blast)स्फोटाची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अग्निशमन दल आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान घटनास्थळावर मोठे बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, एसकेएमसीएचच्या डॉक्टरांचे पथकही रुग्णवाहिका घेऊन तेथे पोहोचले.

Boiler Blast : सहा जण जागीच ठार

हा स्फोट इतका भीषण होता की, ६ कामगार जागीच ठार झाले.  कारखान्यात एवढी भीषण परिस्थिती होती की, एका कामगाराचा फक्त हात, तर कुणाचा पाय सापडला. १० कामगार गंभीररित्या भाजले आहेत. त्यांना उरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटामुळे शेजारील दोन कारखान्यांचे देखील आगीत नुकसान झाले आहे. तसेच शेजारील कारखान्यांमधील दोन जण जखमी आहेत.
दरम्यान शेजारी असणाऱ्या कंपन्यांमधील लोकांनी या स्फोटाच्या भिषणतेची माहिती दिली.या स्फोटामुळे आम्हाला भुकंप झाल्यासारखे वाटले पण काही काळाने आगीचे लोट आल्यावर आमच्या लक्षात आले कंपनीला आग लागली आहे.

बॉयलमधून आगीचे मोठे लोट येत होते. या दुर्घटनेनंतर परिसरातील काही काळ वातावरण गोंधळाचे बनले होते.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT