Latest

रक्तचंदन तस्करी प्रकरण: बंगळूरमधून एकास अटक

backup backup

मिरज पुढारी वृत्तसेवा : मिरजमार्गे होणार्‍या 2 कोटी 24 लाख 85 हजारांच्या चंदन तस्करी प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी बंगळूरमधून आफ्रीद खान या आणखी एका संशयिताला अटक केली. मुख्य संशयित शाहबाज खान आणि इम्रान खान हे दोघे भाऊ फरार झाले आहेत. या दोघांचा याठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाचा व्यवसाय आहे. बंगळूरमधून मिरजमार्गे होणारी रक्तचंदनाची तस्करी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी उघडकीस आणली होती.

मिरज-धामणी रस्त्यावर नाकाबंदी करून बंगळूरमधील टेम्पो पकडून सुमारे 2 कोटी, 45 लाख, 85 हजार रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. याचे मोठे सिंडीकेट बंगळूर येथे सक्रिय असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. अटकेत असलेला टेम्पोचालक यासिन इनायतुल्ला खान याने आणलेले सदरचे चंदन हे बंगळूरमधील शाहबाज खान आणि इम्रान खान यांचे असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या रक्तचंदन तस्करीचे सातारा कनेक्शन उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरचे चंदन हे सातारा येथील एकाकडे जात असल्याच्या संशयावरून तपास सुरू केला आहे.

SCROLL FOR NEXT