Latest

पोलिस कारवाईत ब्लॅक लाइव्हस मॅटरचे सह-संस्थापक पॅट्रिस क्युलर्सच्या चुलत भावाचा मृत्यू? व्हिडिओमुळे खळबळ

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : ब्लॅक लाइव्हस मॅटरचे सह-संस्थापक पॅट्रिस क्युलर्सच्या चुलत भाऊ अंडरसन याचा ट्रॅफिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत मृत्यू झाला, असे वृत्त व्हायरल झालेल्या बॉडी कॅमेरा फुटेजच्या आधारे देण्यात आले आहे. ही घटना 3 जानेवारीला घडली असून, अलीकडील काळात अशा जीवघेण्या घटनांमुळे शहर हादरले आहे. अँडरसन याच्या पूर्वी 45 वर्षीय टाकर स्मिथ आणि 35 वर्षीय ऑस्कर सांचेझ या दोघांनाही पोलिस चकमकीत गोळ्या घालून मारण्यात आले होते. या घटनांमुळे समाज न्यायाची मागणी करत आहे.

अमेरिकेतील व्हेनिस कॅलिफोर्नियातील ही घटना आहे. या बॉडी-कॅम फुटेजमध्ये 3 जानेवारीला घडलेल्या घटनेचे दृश्य दिसत आहे. यामध्ये एका ट्रॅफिक कारवाइत पोलिसांनी रस्त्त्याच्या मधोमध अँडरसनला ताब्यात घेतले. यावेळी एका अधिका-याचा हात त्याच्या मानगुटीवर होता. यावेळी पोलिसांनी त्याला वारंवार टीझ केल्याचे दिसत आहे. (एक प्रकारचा इलेक्ट्रिक शॉक ज्यामुळे माणूस काही काळासाठी पॅरालाईझ्ड होतो.) यावेळी अँडरसन हा जीवाच्या आकांताने ओरडत होता. मदत मागत होता. मात्र, त्याला कोणीही मदत केली नाही.

फुटेजमध्ये असे ऐकू येत आहे की, ते माझा जॉर्ज फ्लॉइड करण्याचा प्रयत्न करत आहेत. मे २०२० मध्ये तत्कालीन पोलीस अधिकारी डेरेक चौविनने ज्याची हत्या केली होती, त्या मिनियापोलिस माणसाचा संदर्भ देत त्याने व्हिडिओनुसार उद्गार काढले. "ते जॉर्ज फ्लॉइडचा प्रयत्न करत आहेत!"

त्यानंतर देखील एक अधिकारी अँडरसनवर दोन वेळा टेसर वापरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या टेसरमध्ये एक स्ट्रेच समाविष्ट आहे. जो 30 सेकंद अखंडित चालला होता.

अँडरसनला शेवटी हतकडी घालून ताब्यात घेण्यात आले. त्याला रुग्णवाहिकेद्वारे सांता मोनिकाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथेच त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. असे पोलिसांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, व्हिडिओ फुटेज आऊट झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत वॉशिंगटन पोस्टने क्युलर्स यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्या लॉस एंजेलिसचे पोलिस प्रमुख मिशेल मूर यांच्या राजीनाम्यासाठी आणि अधिकार्‍यांना त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरण्यासाठी समुदाय रहिवासी आणि कार्यकर्त्यांमध्ये सामील होत आहे. अँडरसनने त्याच्या मृत्यूपूर्वी फ्लॉइडचे नाव घेतले हे ऐकणे किती विनाशकारी होते हे तिने नमूद केले.

दरम्यान, लॉस एंजेलिस काउंटी कॉरोनर कार्यालय अद्याप अँडरसनच्या मृत्यूची चौकशी करत आहे आणि अद्याप त्याचे कारण आणि पद्धती यावर निर्णय घेतलेला नाही.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT