Latest

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक; कर्नाटक विधानसभा निवडणूक : यादी जाहीर होण्याची शक्यता 

backup backup

नवी दिल्ली, ७ एप्रिल, पुढारी वृत्तसेवा, पुढील महिन्यात होऊ घातलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्ली मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, संघटन मंत्री बीएल संतोष, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा सह अनेक जेष्ठ नेते सहभागी होतील. बैठकीत उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान बैठकीसाठी शुक्रवारीच येडीयुरप्पा आणि मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वीच केंद्रीय नेते शहा तसेच नड्डा यांच्यासोबत कर्नाटकच्या कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. संभावित उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी तसेच चाळणीसाठी दिल्लीत पुढील दोन ते तीन दिवसांपर्यंत कर्नाटक कोअर समितीच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील निवडणुकीसंबंधी चर्चा करण्यासाठी नड्डा, संघटन मंत्री बीएल संतोष, निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान तसेच मनसुख मांडविया, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT