Latest

रायबरेली मतदारसंघावरून सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संबोधित करताना भाजपवर निशाणा साधला. भाजप सरकारने कोरोना आणि लॉकडऊनच्या काळात रायबरेली सोबत सावत्र आई सारखी वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना सोनिया गांधी म्‍हणाल्‍या की, 23 तारखेला होणारी निवडणूक अंत्‍यत महत्‍वाची आहे. या सरकारने गेल्‍या 5 वर्षात शेतक-यांच्या पिकाला भाव मिळाला नाही तर सिंचनाची सुविधा तर तरूणासाठी रोजगार उपलब्‍ध केला.

तसेच, सरकारी नोकरीची 12 लाख पदे रिक्‍त आहेत. परंतु देशातील तरुणांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. रोजगार उपलब्‍ध केला नाही, घरगुती गॅस , तेल, पेट्रोल, डीझेल, यांच्या किंमती एवढया वाढवल्‍या आहेत की सामान्यांना घर चालवणे कठीन झाले आहे. तर काँग्रेसने लॉकडाउनमध्ये लोकांना शक्‍य तेवढी मदत केली. बाहेर फसलेल्‍या लोकांना त्‍यांच्या गावी जाण्यास मदत केली. कोरोना मध्ये लोकांना हॉस्‍पिटल मध्ये बेड , औषधे मिळाली नाहीत, तर काहींच्या नोक-या गेल्‍या. आणि मोदी-योगी सरकारने स्‍वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. तर या सरकारने देशाचा भार कमी करण्याऐवजी काही सरकारी कंपन्या विकल्‍या.

आता आम्‍ही रायबरेलीच्या विकासासाठी नविन योजना आणल्‍या आहेत. परंतु रायबरेली सोबत सावत्र आईसारखा व्यवहार करण्यात आला. तुम्ही काँग्रेसचे कामही पाहिले आहे. रोजगार दिला आहे. मात्र अशा संकटाच्या वेळी बजेट वाढण्याऐवजी कमी करण्यात आले. पुढे बोलताना त्‍या म्‍हणाल्‍या की, सेवा आणि हक्‍काच्या राजकारणाचा मार्गचे काँग्रेसने दर्शन घडवले आहे. यामध्ये तरूणांसाठी रोजगार , महिलांना हक्‍क , शेतक-यांना विविध सुविधा आहेत. आपल्‍या विकासासाठी महिलांसाठी शक्ती कायदा, तरुणांसाठी भरती कायदा, प्रगती कायदा तयार करण्यात आले आहेत. दरम्‍यान, प्रियांकाने 40 टक्के तिकिटे महिलांना दिले आहेत, याचा मला आनंद आहे.

गेल्या 5 वर्षांत कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. जनतेच्या हक्कासाठी लढताना आमचे 18 हजार कार्यकर्ते तुरुंगात गेले. येथील सर्वांचे जीवन चांगले सूधारण्याठी आम्ही आहोत. आम्‍ही रात्रंदिवस काम करणारा आणि तुम्हाला खंबीर बनवणाऱ्या योजना आणू. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे हात बळकट करून चांगले भविष्य घडविणारे निवडा. आणि रायबरेलीच्या आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. असे सोनिया गांधी म्‍हणाल्‍या.

हे ही वाचलं का ?? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT