Latest

ते मनमोहन सिंग व्हायचं स्वप्न पाहतायेत: भाजपची राजन यांच्यावर टीका

मोहसीन मुल्ला

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन डॉ. मनमोहन सिंग होण्याची स्वप्न पाहात आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. रघुराम राजन बुधवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले, यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये आहे. या यात्रेत बुधवारी रघुराम राजन सहभागी झाले. रघुराम राजन यांनी यापूर्वी मोदी सरकारवर टीका केलेली होती. नोदबंदी आणि मोदी सरकारच्या इतर धोरणांना त्यांनी विरोध केला होता. आर्थिक मंदीला मोदी सरकारचे सामाजिक आणि राजकीय धोरण जबाबदार आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

रघुराम राजन यांच्या यात्रेतील सहभागावरून भाजप नेते अमित मालविय यांनी टीका केली. ते म्हणाले, "रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काँग्रेसनियुक्त माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणे, यात कोणतेही आश्चर्य नाही. डॉ. मनमोहन सिंग होण्याचे स्वप्न ते पाहातात. त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील भाष्य हे कचऱ्यात टाकण्याच्या लायकीचे आहे. ते पूर्ण संधीसाधू आहेत." मालविय यांचे ट्विट मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. अनेकांनी मालविय यांच्यावर टीकाही केलेली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT