Latest

bjp leader devendra fadanvis : दिल्लीत झालेल्या भेटींवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

backup backup

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadanvis) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी दिल्लीत असल्याने एकूणच राजकीय चर्चांना उधाण आले होते.

परंतु, कुठल्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे याची कल्पना नाही, चंद्रकांत दादा पाटील आणि मी भाजप च्या संघटनात्मक बैठकीसाठी दिल्लीत आलो होतो, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत बोलतांना दिली.

bjp leader devendra fadanvis : संघटनेची पुढची वाटचाल आणि त्या अनुषंगाने बैठकीत आढावा

भाजप चे संघटन मंत्री बी.एल.संतोष, शिव प्रकाश, सी.टी.रवी यांच्या सोबत बैठक झाली. एकूणच संघटनेची पुढची वाटचाल आणि त्या अनुषंगाने बैठकीत आढावा घेण्यात आला. चार ते पाच तास ही बैठक चालली. यापेक्षा कुठलाही वेगळा अजेंडा बैठकीचा नव्हता, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली.

राज्यात संघटन बदलाचे वारे वाहत असल्याची चर्चा त्यामुळे रंगली होती.

परंतु, कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे यांच्या बोलणे टाळणे

मार्च महिन्यात राज्यात भाजप सत्तेवर येणार असे वक्तव्य जयपूर मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

परंतु, आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकलेली नाही असे म्हणत फडणवीस यांनी यावर अधिक चे भाष्य करने टाळले.

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत काहीतरी चमत्कार घडवून येईल अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. परंतु, नागपूरच्या निवडणुकीत चमत्कार घडणार नाही.

भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

SCROLL FOR NEXT