Latest

दिल्‍लीत पूरसदृश्य स्थिती, आरोपांऐवजी काम करा : भाजपचा ‘आप’ला सल्ला

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : यमुनेच्या जलस्तरात वाढ झाल्याने दिल्लीतील अनेक भागात अजूनही पाणी भरले आहे. पूरसदृश्य स्थितीचा सामना दिल्लीकरांना करावा लागत असतांना सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजप मध्ये जुंपली आहे.दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. 'आप'ने दिल्लीत उद्भवलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीसाठी केंद्र सरकार आणि नायब राज्यपालांना जबाबदार धरले होते. आता या मुद्दयावर भाजपकडून आपला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

'दिल्‍ली सरकारचे मंत्री 'एनडीआरएफ'लाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात'

अशास्थितीतही आम आदमी पार्टी काम करण्याऐवजी आरोप करण्यात व्यस्त आहे. केंद्र आणि एलजी तसेच त्यांची पथके सेवेत कार्यरत आहे, असे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले आहे.आरोप करण्‍यापेक्षा काम करण्याचा सल्ला देखील भाजपने आपला दिला आहे.आ प सरकार केवळ आरोप करते. सरकारचे मंत्री एनडीआरएफ ला देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात,असा दावा देखील भाजपने केला आहे.अशात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

यमुनावरील एक ड्रेग रेग्युलेटर निकामी झाल्याने रहदारीसाठी अत्यंत व्यस्त असलेल्या आयटीओ परिसरात यमुनेचे पाणी शिरले होते. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना आणि दिल्ली चे मंत्री सौरभ भारद्वाज यांच्यामध्ये प्रसारमाध्यमांसमोरच वाक् युद्ध त्यानंतर बघायला मिळाले होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT