Latest

Bilkis Bano case : बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींनी केले आत्मसमर्पण

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बिल्किस बानो प्रकरणातील अकरा दोषींनी रविवारी (दि.२१) रात्री उशिरा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा उप कारागृहात आत्मसमर्पण केले. याबाबत  गोध्रा येथील मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. (Bilkis Bano case) सर्वोच्च न्यायालयाने ८ जानेवारी रोजी ११ जणांना दोन आठवड्यांच्या आत तुरुंगात परत जाण्याचे आदेश दिले होते. पाच दोषींनी  सुप्रीम सर्वोच्च न्यायालयात प्रकृती अस्वास्थ्य, येऊ घातलेली शस्त्रक्रिया, मुलाचे लग्न आणि कापणी यासह विविध कारणास्तव आत्मसमर्पण करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता, परंतु न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळले. (Bilkis Bano case)

बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले होते. बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींना शिक्षेतून सूट देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानुसार या प्रकरणातील दोषींना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. दोषींना दोन आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. (Bilkis Bano case)

Bilkis Bano case : काय आहे प्रकरण

गुजरातमध्ये २००२ साली जातीय दंगल उसळली होती. यादरम्यान, बिल्कीस बानोसह यांंच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. आणि कुटुंबातील इतर सदस्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोषी सापडलेल्या ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणावर निर्णय देताना आरोपींना शिक्षा देण्यासाठी गुजरात सरकार सक्षम नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच गुजरात सरकारला दोषींच्या सुटकेचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्रात झाली तर सुटकेचा निर्णयही महाराष्ट्र सरकार घेईल. ज्या राज्यात गुन्हेगारावर खटला चालवला जातो त्याच राज्यात शिक्षा सुनावली जाते आणि त्याच राज्याला दोषींच्या माफीच्या याचिकेवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. असेही याबाबत निर्णय देताना खंडपीठाने म्हटले होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT