Latest

बिग बॉस मराठी : रंगणार शेवटचे कॅप्टन्सी कार्य ‘जो जिता वही सिकंदर’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार शेवटचे कॅप्टन्सी कार्य 'जो जिता वही सिकंदर'. काल बिग बॉस यांनी जाहीर केले पात्र सदस्यांसोबतच अपात्र सदस्यांनादेखील उमेदावरी मिळत आहे. बघुया आता शेवटचे कॅप्टनपद कोणाला मिळणार आणि कोण बनणार घराचा शेवटचा कॅप्टन. 'जो जिता वही सिकंदर'मध्ये काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल.

टास्क म्हंटल म्हणजे राडा, वादावादी ही होणारच. जय VS विशाल तर गायत्री VS मीरा बघायला मिळणार आहे. तर इतर सदस्य देखील एकमेकांच्या विरोधात खेळणारच. यामध्ये कोण विजयी ठरणार आज कळेलच.

टास्कमध्ये कोण कोणाच्या विरोधात खेळणार? आणि कोण कोणाच्या बाजूने खेळणार? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT