Latest

Bigg Boss 17 Winner : मुनव्वर फारूकी ठरला ‘बिग बॉस सीझन – 17’ चा विजेता

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क : १०४ दिवसांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर मुनव्वर फारूकी 'बिग बॉस सीझन – १७' चा विजेता ठरला. रविवारी (दि.२८) झालेल्या महाअंतिम फेरीत मुनव्वर फारूकीने याने सर्वाधिक मते मिळवून 'बिग बॉस सीझन – १७' च्या टॉफीवर आपले नाव कोरले. अभिनेता सलमान खानने हा शो होस्ट केला होता. टॉप दोन मध्ये मुनव्वर आणि अभिषेक यांच्यात चुरशीची टक्कर पहायला मिळाली. त्यानंतर 'बिग बॉस १७' चा विजेता कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र शेवटी मुनव्वरने बाजी मारली. ६ तास चाललेल्या या 'शो' च्या विजेत्याचं नाव १२ नंतर घोषित करण्यात आलं. (Bigg Boss 17 Winner)

विजेत्याला काय मिळालं

'बिग बॉस सीझन – १७' चा विजेता मुनव्वर फारूकी याला एक आलिशान कार व भव्यदिव्य ट्रॉफीसह ५० लाखाचं बक्षीस मिळालं आहे. याआधी झालेल्या बिग बॉस सिझन -१६ च्या रक्कमेपेक्षा ही रक्कम जास्त आहे. (Bigg Boss 17 Winner)

बिग बॉस -१६ च्या विजेत्याला मिळाली होती ही बक्षिसे

बिग बॉस सीझन -१६ चा विजेता एमसी स्टॅनने ठरला होता. त्याने अंतिम फेरीत शिव ठाकरेंचा पराभव करून टॉफी जिंकली होती. या प्रसिद्ध रॅपरला त्याच्या विजयानंतर बक्षीस म्हणून ३१ लाख ८० हजार रुपये देण्यात आले. तसेच एक आलिशान कारही देण्यात आली होती. या शो नंतर त्याची लोकप्रियता वाढली.

'मुनव्वर फारूकी' विजेता होणार असल्याचं आधिच केलं होतं भाकित

शोच्या फिनालेपूर्वी रॅपर बादशाहने मुनावर फारुकीला पाठिंबा दर्शवत इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने म्हटलं आहे की,"ठीक आहे, मला ते सांगायची गरज नाही, पण बिग बॉस -१७ मध्ये फक्त मुनव्वर जिंकणार आहे. वोट करा, कारण ट्रॉफी… आधीच माहित आहे." (Bigg Boss 17 Winner)

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT