Latest

BB17 Samarth Jurel Kissing Video : समर्थ जुरेल-ईशा मालवीयचा किसिंग व्हिडिओ, इंटिमेट सीन कॅमेराबद्ध

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिॲलिटी शो बिग बॉस-१७ मध्ये ईशा मालवीय (Isha Malviya) आणि समर्थ ज्युरेलची लव्हलाईफ सर्वांसमोर आली. ईशा आधी अभिषेक कुमारला डेट करत होती. (BB17 Samarth Jurel Kissing Video) आता ती समर्थ जुरेल (Samarth Jurel) सोबत आहे. मजेशीर गोष्ट ही की, तिघे एकत्र आपला गेम खेळत आहे. बिग बॉसच्या या घरात ईशा आणि समर्थ अनेकदा इंटीमेट होताना स्पॉट झाले. दोघे किस करताना कॅमेरात दिसले. पण आज काल ईशा-समर्थ यांच्यातील भांडणे सारखे होताना दिसत आहे. दरम्यान, ईशा – समर्थचे शोमध्ये अंधार असतानाचे व्हिडिओ कॅमेराबद्ध झाले आहेत. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (BB17 Samarth Jurel Kissing Video)

संबंधित बातम्या –

टास्कमध्ये ईशा मालवीय-समर्थ जुरेलची जवळीक

सलमान खानचा शो बिग बॉस १७ (Bigg Boss 17) मधील लेटेस्ट एपिसोडमध्ये एक मोठा बदल केला आहे. एपिसोडमध्ये पाहायला मिळालं की, मेकर्सनी घराच्या कंटेस्टेंट्सना चौकमध्ये राहणयासाठी सांगितलं. याची घोषणा खूप ड्रामॅटिक अंदाजात झाली. घरामध्ये खूप वेळ लाईट बंद सुरु होत होती. दरम्यान, ईशा मालवीय-समर्थ जुरेल यांचा इंटिमेट फोटो व्हायरल झाला. याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला. त्यामध्ये घरातील सर्व कंटेस्टेंट इकड तिकडे पळताहेत. पण, समर्थ आणि ईशा एकमेकांना किस करताना दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दोघांच्या शेजारी विक्की जैन उभा आहे, पण त्यालाही या दोघांच्याबद्दल काही माहिती झाले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT