Latest

Bigg Boss 17 : घरात घमासान! अंकिता लोखंडे-अभिषेक कुमार यांच्यात जोरदार भांडण

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क – 'बिग बॉस-१७ ची भव्य सुरुवात झाली. पण दुसऱ्याच दिवशी घरात सुपर राडा झालेला पाहायला मिळाले. सुपरस्टार सलमान खान हा शो होस्ट करत आहे. लोकप्रिय रिॲलिटी शो १७ मध्ये अनेक सेलेब्सची एंट्री झालीय. (Bigg Boss 17 ) धमाकेदार ओपनिंगनंतर सेलेब्स शोमध्ये आपली जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत. (Bigg Boss 17)

संबंधित बातम्या – 

दरम्यान, बिग बॉस सीझन – १७ मध्ये अंकिता लोखंडे -अभिषेक कुमार यांच्यात जोरदार भांडण होताना पाहण्यात आले. अंकिता – अभिषेक दोघेजण किचनमध्ये आपापसात भांडताना दिसत आहेत. आणि या भांडणाचे कारण आहे, जेवण. अभिषेकने अखेरच्या क्षणी अंडे खाण्यस नकार दिला, ज्यामुळे जेवण व्याया गेले.

यामुळे अंकिता नाराज झाली. अभिषेकने पलटवार करत म्हटले की, अंकिता केवळ भांडण्यासाठी 'मुद्दा' शोधतेय. ही गोष्ट पवित्र रिश्ता अभिनेत्रीला आवडली नाही आणि ती भडकली.

दरम्यान, अभिषेक आधीपासूनच त्याची एक्स गर्लफ्रेंड ईशा मालवीयसोबत भांडणामुळे चर्चेत आहे. दोघांनीही प्रियंका चौधरी आणि अंकित गुप्ता यांच्या उडारियामध्ये एकत्र काम केले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ते एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचा  ब्रेकअप झाला होता.

रविवारी, १५ ऑक्टोबर रोजी बिग बॉसचे ग्रँड प्रीमियर झाले होते. सोमवारी १६ रोजी बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचा पहिला दिवस होता. बिग बॉसमध्ये मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, विक्की जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालविया, मन्नारा चोप्रा, नवीद सोले, अनुराग डोभाल, सना रईस खान, जिग्ना वोरा, सोनिया बंसल, खानजादी, सनी आर्य, रिंकू धवन, अरुण मैशेट्टी, अभिषेक कुमार या स्पर्धकांचा समावेश आहे.

Video-Livefeed Updates and #BiggBoss17_Tak  x वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT