पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडिया आघाडीत नेत्यावरून महायुद्ध सुरू झाले आहे. त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही. त्यामुळे आघाडीने पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा नवा फार्म्युला आणला आहे. इंडिया आघाडीला देश चालवायचा नाही, तर केवळ मलई खायची आहे, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.२९) विरोधकांवर केला. PM Modi
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. PM Modi
मोदी यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरूवात करून मी सोलापूरकरांकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे, अशी भावनिक साद घातली. सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मी वर्षात दोन वेळा आलो आहे. विकासाची गॅरंटी देण्यासाठी आलो असून पुढील ५ वर्षांच्या विकासाच्या गॅरंटीला साथ द्या. त्यासाठी सोलापूरकरांकडे मते मागण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, संविधान कुणीच बदलू शकणार नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही आता संविधान बदला येणार नाही. आरक्षणाचा मोठा हिस्सा अल्पसंख्यांकांना देण्याचा मोठा घाट काँग्रेसने घातला आहे. देशातील संपत्तीवर पहिला हक्क वंचित समाजाचा आहे. समाजाला जोडून ठेवण्याचे आमचे पहिले उद्दिष्ट आहे. देशातील शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचविण्याचे आमचे स्वप्न आहे. १० वर्षांत पहिल्यांदाच देशातील २५ कोटी जनता दारिद् रेषेच्या बाहेर आली आहे.
हेही वाचा