Latest

Rohit Pawar : मुंबई हायकोर्टाकडून रोहित पवारांना मोठा दिलासा; MPCB ची नोटीस रद्द

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. न्यायमुर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला आहे.

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या 2 युनिट्स पुढच्या 72 तासांत बंद करण्यात यावा, अशी सूचना या नोटीसमध्ये दिली होती. रोहित पवार यांनी स्वत: ट्विट करत (X) याबाबतची माहिती दिली होती. या प्रकरणानंतर रोहित पवार यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. MPCB नं पुन्हा एकदा पडताळणी करून जे आक्षेप असतील त्यावर नवी नोटीस जारी करावी, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. रोहित पवार यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतल्यानंतर सातत्याने या प्रकरणावर सुनावणी सुरु होती.

मात्र आज अखेर मुंबई हायकोर्टाने या प्रकरणावरील सुनावणी निकाली काढली आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने रोहित पवारांना मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने प्रदूषण नियंत्रक मंडळाची नोटीस रद्द केली आहे. प्रदूषण नियंत्रक मंडळाने नव्याने निरीक्षण करुन नोटीस जारी करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. रोहित पवारांना पंधरा दिवस मुदत देऊन त्यांचं उत्तर घेतल्यावरच निर्णय घ्या, असाही आदेश कोर्टाने पवारांना दिला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT