Latest

मध्‍य प्रदेश मुख्‍यमंत्र्यांच्या Z प्‍लस सुरक्षेत चूक!, नेमकं काय घडलं?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या Z प्‍लस सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे. शहडोलमध्ये मुख्‍यमंत्री यादव ज्‍या प्रवेशव्‍दारामधून कार्यक्रमाला जाणार होते. तेथेच पोलिसांचा गणवेश घातलेला एक मद्यधुंद तरुण उभा होता. त्‍याने तिथे उपस्थित मुलींशीही गैरवर्तन केल्‍याचा धक्‍कादायक प्रकारही उडकीस आला आहे. ( Big lapse in security of CM Mohan Yadav )

पाेलीस म्‍हणून आला आणि पोलिसांसमोरच पसार झाला…

मद्यधुंद अवस्थेतील तरुण पोलिसांचा गणवेश परिधान करुन सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये घुसला आणि त्यांच्यामध्ये उभा होता. येथे सांस्‍कृतिक कार्यक्रमासाठी उभ्‍या असणार्‍या मुलींशी त्‍याने छेडछाड केली. पोलीस मद्यधुंद अवस्थेत मुलींशी कसा बोलतोय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तो पळून जाऊ लागला. विशेष म्‍हणजे पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्‍या उपस्थितीत तो पळून गेला; पण एकाही पोलिसाने त्याला पकडले नाही. ( Big lapse in security of CM Mohan Yadav )

शहडोलमध्ये मुख्‍यमंत्री ज्‍या प्रवेशव्‍दारामधून कार्यक्रमाला जाणार होते त्‍या गेटचे प्रभारी टीआय रघुवंशी यांनी सांगितले की, तो कोण होता, याबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. माझ्या टीममध्ये 9 जण आहेत, त्यांचा त्यात समावेश नाही. त्‍याचा शोध सुरु आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT