Latest

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज, उद्या ट्रेलर येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा नवा चित्रपट येतोय. आज चित्रपट निर्मात्यांनी थँक्यू फॉक कमिंग या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलज केले. (Bhumi Pednekar) भूमीनेदेखील हे पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. इन्स्टाग्रामवर तिने दोन फोटो शेअर केले आहेत. त्याला कॅप्शनमध्ये When the ending is before the beginning..?Don't forget to watch #ThankYouForComing. Trailer out on 6th Sept, 1:50 PM.

या चित्रपटाचा ट्रेलर ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी रिलीज होणार आहे. भूमी पेडणेकर ही बेडवर दिसतेय. ती पोस्टरमध्ये हसताना दिसतेय.

थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटात भूमी मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत डॉली सिंग, कुशा कपिला, शिबानी बेदी, नताशा रस्तोगी, सुशांत दिवगीकर, सलोनी, डॉली अहलुवालिया, करण कुंद्रा आणि अनिल कपूर यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

भूमी म्हणाली, "टीआयएफएफमध्ये माझी ही पहिलीच वेळ आहे. माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेला चित्रपट घेऊन मी येत आहे, याबद्दल मी आनंदी आहे, थँक्यू फॉर कमिंगसाठी धन्यवाद. यापेक्षा विशेष म्हणजे आमची प्रतिष्ठित रॉय थॉम्पसन हॉलमध्ये गाला प्रीमियरवेळी निवड झाली आहे."

त्या रेडकार्पेटवर चालण्यासाठी माझे सहकलाकार, दिग्दर्शक करण बुलानी आणि आमचे निर्माते अनिल कपूर आणि रिया कपूर यांच्यासोबतचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरणार आहे, असेही भूमीने नमूद केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT