Latest

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ‘डुलकी’ने केला घात, नगर पालिका अधिकारी निलंबित!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : निरोगी शरीरासाठी  झोप एक अत्‍यावश्‍यक बाब. मात्र कोठे झोपावे याचे ताळतंत्रच गमावले तर निश्‍चित मोठा फटका बसतो. आजवर तुम्‍ही डुलकी लागल्‍याने अनेक भीषण अपघात झाल्‍याचे एकले असेल; पण गुजरातमध्‍ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नगर पालिका अधिकार्‍याला डुलकी लागली अन् त्‍याला तत्‍काळ निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागले.

नेमकं काय घडलं?

गुजरातमधील कच्‍छ जिल्‍ह्यातील भुज येथे शनिवारी (दि.२९) मुख्‍यंमत्री भूपेंद्र पटेल कच्छमधील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यासाठी गेले होते. या निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्‍यमंत्री पटेल भाषण करत होते. यावेळी भुज नगर पालिकेचे अधिकारी जिगर पटेल हे चक्‍क झोपले होते. हे दृश्‍य व्‍हिडिओ कॅमेर्‍यात कैद झाले. याची गंभीर दखल गुजरातच्‍या नगरविकास आणि नगर गृहनिर्माण विभागाने घेतली.

शनिवारी सायंकाळी तत्‍काळ प्रभावाने जिगर पटेल यांना निलंबित करण्‍यात आल्‍याची माहिती नगरविकास व नगर गृहनिर्माण विभागाच्‍या अधिकार्‍यांनी दिली. निष्काळजीपणा आणि कर्तव्यात निष्ठा नसल्याबद्दल त्यांच्‍यावर ही कारवाई करण्‍यात आली आहे. गुजरात नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९७१ च्या नियम ५(१)(अ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात झोपी जाणे हे गैरव्यवहार आणि शिस्‍तभंगपणा दर्शवते, असेही विभागाने म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT