Latest

BJP Anil Antony: अनिल अँटनी यांची भाजप राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय जनता पक्षाने अनिल अँटनी यांची पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केली (BJP Anil Antony) आहे. मनजिंदर सिंग सिरसा यांची देखील भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र 'एएनआय'ने त्यांच्या 'x' वरून (पूर्वीचे ट्विटर) प्रसिद्ध करत हे वृत्त दिले (BJP Anil Antony) आहे.

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी ६ एप्रिल, २०२३ रोजी भाजपात प्रवेश केला होता. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत अनिल यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. (BJP Anil Antony)

बीबीसीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यानंतर काॅंग्रेसकडून त्याचे समर्थन करण्यात आले होते. मात्र अनिल अँटनी यांनी त्यावरून काॅंग्रेला सुनावले होते तर दुसरीकडे बीबीसीवर आगपाखड केली होती. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांनी काँग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर एप्रिलच्या ६ तारखेला भाजपमध्ये प्रवेश (BJP Anil Antony) केला होता.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT