Maharashtra No 1in FDI : आनंदाची बातमी! विदेशी गुंतवणुकीत यावर्षीही ‘महाराष्ट्रच नंबर 1’; फडणवीस यांची माहिती | पुढारी

Maharashtra No 1in FDI : आनंदाची बातमी! विदेशी गुंतवणुकीत यावर्षीही 'महाराष्ट्रच नंबर 1'; फडणवीस यांची माहिती

पुढारी ऑनलाइन डेस्क : Maharashtra No 1in FDI : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत 2022-23 प्रमाणेच या चालू आर्थिक वर्षाच्या (2023-24) पहिल्या तिमाहीत सुद्धा महाराष्ट्रच नंबर 1 आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 च्या कालावधीत आलेल्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची यादी जारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून कर्नाटक आणि गुजरात अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करून याची माहिती दिली आहे.

या माहितीत फडणवीस यांनी म्हटले आहे की 2022-23 या आर्थिक वर्षात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर (Maharashtra No 1in FDI) आहे. तसेच दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे आणि यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन देखील केले आहे. सोबत त्यांनी डीपीआयआयटीचा तक्ता देखील जोडला आहे. वाचा फडणवीस काय म्हणाले त्यांच्याच शब्दांत…

Maharashtra No 1in FDI : फडणवीस यांची ‘X’ (ट्विटर) वरील पोस्ट…

”आनंदाची बातमी !
2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे.
डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ₹36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.
दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरु आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे मनापासून अभिनंदन!
#Maharashtra #FDI #MaharashtraNo1 #BestState #investments #MagneticMaharashtra @mieknathshinde”

 

Back to top button