Latest

Bharat Jodo Yatra : शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत; जयराम रमेश यांची माहिती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी या यात्रेत सहभाग दर्शवला आहे. दोन दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, युवानेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार हेदेखील उद्या (दि. ११) यात्रेत सहभागी होणार असल्याच्या चर्चेंना ऊत आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार हे काही कारणास्तव उद्या भारत जोडो यात्रेत हजर राहाणार नसल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या रुग्णालयात आहेत. राहुल गांधी आणि माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढचे तीन ते चार आठवडे विश्रांती घेण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे शरद पवार उद्या 'भारत जोडो यात्रे'त सहभागी होणार नाहीत. परंतू शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवानेते आदित्य ठाकरे उद्या या यात्रेत सहभागी होतील अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT