Latest

Bharat Jodo Nyay Yatra: ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या सभेचे पोस्टर लॉन्च; संविधान लढ्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात ‘न्याय’ गर्जना सभा

मोनिका क्षीरसागर

मुंबई,पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ची रविवारी १७ मार्चला मुंबईत शिवाजी पार्कवर सायंकाळी पाच वाजता जाहीर सभेने सांगता होणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून, या सभेच्या पोस्टरचे लॉन्चिंग आज (दि.१३) करण्यात आले. (Bharat Jodo Nyay Yatra)

शनिवारी १६ मार्चला चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप

मुंबईत १७ मार्चला शिवतीर्थावर होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर लॉन्च करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये "शिवतीर्थावर होणार न्याय गर्जना, न्यायासाठी लढायचं गद्दारांना नडायचं, संविधानाला टिकवायचं, आठवणीने यायचं अशा आशयाचा मजकूर आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेने 12 मार्चला नंदूरबार येथून महाराष्ट्रात प्रवेश केला. 16 मार्चला चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप होणार आहे. 17 मार्चला मुंबईत होणाऱ्या ऐतिहासिक सभेत लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार आहे. या पार्श्वभूमीवर या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. यात गद्दारांना नडण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी, न्यायासाठी लढण्यासाठी आठवणीने या' असं आवाहन करण्यात आले आहे. (Bharat Jodo Nyay Yatra)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT