Latest

Benefits of Gulkand : रोज एक चमचा गुलकंद खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तळपत्या उन्हात तर आपल्या अंगाची लाही लाही तर होत असतेच. रात्री झोपल्यानंतरही आपले पाय रखरखत असतात. तर काहींना पोटात आग किंवा धग पडल्यासारखे होते. अशावेळी तुम्ही गुलकंद खाल तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. रोज एक चमचा गुलकंद खाल्ल्याने आरोग्यदायी मिळणारे फायदे भरपूर आहेत. गुलकंद गुलाबांच्या पाकळ्यांपासून बनवले जाते. (Benefits of Gulkand) पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे अनेक तत्वे यामध्ये असतात. गुलकंदच्या सेवनाने अनेक गंभीर आजार दूर होऊ शकतात. गुलकंदची चव तर अप्रतिम असतेच उन्हाळ्यात याचे सेवन करणे खूपच फायदेशीर ठरतात. (Benefits of Gulkand)

गुलकंदचे फायदे –

वजन घटवण्यासाठी – 

गुलकंदचे औषधी गुण पाहता वजन घटवण्यासाठी गुलकंद खाल्ले जाते.

घामापासून सुटका –

गरमीमध्ये अधिक घाम येत असेल तर गुलकंद खावे. यामुळे अधिक घाम येणार नाही. आळस आणि अशक्तपणाही दूर होतो.

उष्णतेपासून बचावासाठी –

गरमीमध्ये गुलकंद खावे. शरीराचा होणार दाह कमी होतो.

तोंड आले असेल तर –

उष्णता वाढून तोंड आले असेल तर गुलकंद खायलाच हवे. पोटाची समस्या दूर करण्यासाठी गुलकंद फायदेशीर आहे.

चमकदार त्वचेसाठी – 

गुलाब चांगलं ब्लड प्यूरीफायर आहे. त्याच्या सेवनाने रक्त स्वच्छ होतं. चेहऱ्यावर चमक येईलच पिंपल्स, काळ्या डांगांचीही समस्या दूर होते.

पोट चांगले राहण्यासाठी-

गरमीमध्ये जर तुमचे पोट खराब होत असेल तर गुलकंद खाल्ल्याने ही समस्या दूर होऊ शकते.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही गुलकंद खाऊ शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT