Latest

Ben Stokes : सीएसकेच्या बेन स्टोक्सची ‘आयपीएल’मधून माघार

Shambhuraj Pachindre

चेन्नई; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमिअर लीग 2024 च्या तयारीला वेग पकडला असताना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार व अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने 'आयपीएल 2024' पासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्क लोड मॅनेज आणि फिटनेसचे कारण देत त्याने हा निर्णय घेतला आहे. वन-डे क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेत त्याने नुकत्याच पार पडलेल्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत सहभाग घेतला होता. 16.25 कोटी रुपये मोजून 'सीएसके'ने बेन स्टोक्सला आपल्या ताफ्यात घेतले होते, त्याच्या माघारीमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या पर्समध्ये आयपीएल लिलावासाठी 28 कोटी रुपये राहिले आहेत. (Ben Stokes)

'सीएसके'च्या व्यवस्थापनाने स्टोक्सचा हा निर्णय मान्य केला आहे. आयपीएल 2024 पूर्वी इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे स्टोक्सवर प्रचंड वर्क लोड असणार आहे. आयपीएलनंतर जूनमध्ये टी-20 वर्ल्डकपही खेळायचा आहे. 32 वर्षीय स्टोक्सने 2017 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 45 सामन्यांत त्याने 935 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 2 शतके व 2 अर्धशतके आहेत. नाबाद 107 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. (Ben Stokes)

आयपीएल कारकिर्दित त्याने 81 चौकार व 32 षटकार खेचले आहेत. आयपीएल 2023 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने 16.25 कोटी रुपये मोजून स्टोक्सला आपल्या ताफ्यात घेतले होते. त्याने लखनौविरुद्ध चेन्नईत शेवटचा आयपीएल सामना खेळला होता आणि त्यात 8 धावा केल्या होत्या.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT