बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी दडपशाहीचा मार्ग अवलंबल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी सायंकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पोलीस आयुक्त कार्यालयावर मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुनाप्पा पुजारी म्हणाले की, आम्ही सुवर्णसौधसमोर आंदोलनासाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. पोलिसांनीही परवानगी दिली होती, मात्र सोमवारी सकाळी आम्हाला आंदोलन करण्यासाठी जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही पोलिसांची दडपशाही आहे. एकीकडे वकिलांना सोडून देत असताना आम्हावर अन्याय केला आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही मोर्चा काढून येथे निदर्शने केली.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंघय्या यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनासाठी तुम्हाला रीतसर परवानगी देण्यात येईल असे सांगितले.
हेही वाचा;