Latest

Chicken Kebab Recipe : श्रावण सुरू होण्याआधी घरी बनवा सहज आणि सोप्या पद्धतीने चिकन कबाब

मोनिका क्षीरसागर

साहित्य : बोनलेस चिकन 250 ग्रँम,1 सिमला मिरची,1 कांदा,1 टोमँटो,1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग,1 चमचा चाट मसाला, 3 चमचे दही, 1 चमचा तेल, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, पुदीना, सजावटीसाठी…

Chicken Kebab Recipe
Chicken Kebab Recipe

कृती

प्रथम चिकन स्वच्छ धुऊन घ्या. सिमला मिरची, कांदा, टोमँटोचे गोल काप करून घ्या. यानंतर एका बाऊलमध्ये ३ चमचे दही घ्या. आलं-लसूण पेस्ट, हळद, हिंग, गरम मसाला, मीठ हे सर्व साहित्य दह्यात मिक्स करून घ्या. हे सर्व मिश्रण चिकनला लावून घ्या. मिश्रण लावलेले चिकनचे तुकडे अर्धा तास (1/2) मॅरिनेटसाठी झाकून ठेवा. आता एक स्टीक घ्या. या स्टीकला चिकनचे तुकडे, कांदा, सिमला मिरची, टोमॅटोचे काप लावा. यानंतर ते शेगडी किंवा जाळावर चांगले भाजून घ्या. घरी मायक्रोव्हेव असल्यास ओव्हन 180 डिग्रीला प्री हिट करा आणि त्यानंतर 20 मिनिटे ओव्हनला सेट करा. कबाब स्टीक चांगले भाजून घ्या. तुमच्या आवडीनुसार स्टीकवर चिरलेली कोथिंबीर, पुदीना टाकून सजावट करून सर्ह करा.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT