Latest

बीड : मंत्री झालेल्या भावाचे बहिणीने केले औक्षण; धनंजय मुंडेंचे बहीण पंकजा मुंडेंकडून कौटुंबिक स्वागत

निलेश पोतदार

परळी वैजनाथ; पुढारी वृत्‍तसेवा गेल्या अनेक वर्षात राजकारणात एकमेकांचे विरोधक म्हणून काम केलेल्या मुंडे बहीण भावात गेल्या काही महिन्यांपासून दुरावा कमी झाला. हळूहळू त्यांच्यातील राजकीय दुरावा कमी होत गेला आहे. बहीण भावाचे हे नाते आबाधित असल्याचे वेळोवेळी दोघांनीही स्पष्ट केलेलेच आहे. मात्र आता या नात्यात दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल अशी स्थिती आली आहे.

अजित दादा यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या अनुषंगानेच भाजपा राष्ट्रीय सचिव असलेल्या धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी मंत्री झालेल्या आपल्या या भावाचे अतिशय आत्मीयतेने कौटुंबिक स्वागत केले असून, आज पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे औक्षण करत व पेढा भरवत अभिनंदन केले. त्याचप्रमाणे पंकजाताई भाजपाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतात या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी त्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याबाबतचे फोटो धनंजय मुंडे यांनी ट्विट केले असून, राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT